सुरक्षा रक्षकाने घेतला गळफास, हत्या की आत्महत्या पोलीस तपासाअंती होणार निष्पन्न

0
21
Advertisements

घुग्गुस – वेकोली पैनगंगा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत 28 वर्षीय राकेश बेल्लरवार याने कामावर असतांना शेल्टर हाऊस मध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
विरुर गाडेगाव रस्त्याजवळ हे शेल्टर हाऊस आहे, सकाळी राकेश च्या सहकाऱ्यांना ही बाब समजली असता त्यांनी याची सूचना वेकोली व पोलिसांना दिली.
ज्याठिकाणी राकेशने गळफास लावला आहे, त्यावरून निष्पन्न होते की त्याठिकाणी गळफास घेणं हे शक्य नाही, त्याच्या पायाजवळ टेबल असताना गळफास घेतल्यावर राकेश आपले पाय टेबलावर ठेवू शकला असता, ही हत्या की आत्महत्या हे पोलिसांच्या चौकशीनंतर निष्पन्न होणारचं.
राकेशला दारूचे व्यसन होते त्याच्या व्यसनाने त्याची पत्नी सुद्धा माहेरी गेली होती अशी माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here