चंद्रपूर – सध्या जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे रोज हजारो बाधित समोर येत असताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नियम व अटींसह 4 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या चंद्रपूर व गडचिरोली ह्या दुर्गम भागातील शाळा सुरू करू परंतु त्या संपूर्ण नियम व अटींच्या अधीन राहूनच, शहरी भागात ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे परंतु ज्या पाल्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्या शिक्षणाच काय याचा विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय काळजी घेण्यात आली आहे ?
१. ज्या गावांमध्ये/ भागामध्ये मागील ३० दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही त्या भागातील शाळा सुरू होणार .
२. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे .
३. विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात येणार आहे
४. कोरोना काळात स्वतःची काळजी , स्वच्छतेची काळजी याबाबत जागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार आहे .
५. शाळेमध्ये पालन करण्यात येणारी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे .