गिरीजा किन्नाके यांनी माझ्यावर लावलेले आरोप खोटे, 25 लाखाचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, अब्बास अली बशारत अली यांची पत्रपरिषदेत माहिती

0
152
Advertisements

भद्रावती, अब्बास अजानी
बनावट दस्ताऐवज तयार करुन व खोटी स्वाक्षरी करुन आपले घर हडप केल्याचा गिरीजा किन्नाके यांनी माझ्यावर पत्रपरिषदेतून केलेला आरोप खोटा असून माझी बदनामी झाल्यामुळे मी गिरीजा किन्नाके यांच्या विरोधात 25 लाखाचा अब्रुनुकसानीचा न्यायालयात दावा ठोकणार आहे,अशी माहिती येथील नवीन सुमठाना वार्डातील रहिवाशी व शहरातील अमन गारमेंटस् चे संचालक अब्बास हुसेन बशरत अली यांनी पत्रपरिषदेत दिली.
अब्बास अली यांनी पत्रपरिषदेत सांगितले की,मी भद्रावती शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी असून अनेक वर्षापासून भद्रावती शहरात माझे वास्तव्य आहे.मी सन 2012 मध्ये रीतसर पैसे देऊन श्रीमती गिरीजा नानाजी किन्नाके या महिलेकडून तिचे राहते घर विकत घेतले.
सदर जागा महसूल विभागाची असल्याने घराच्या इमल्याची रक्कम 3 लाख 50 हजार रुपये मी श्रीमती किन्नाके यांना दिली.तसे विक्रीपत्र दि.14 मार्च 2012 रोजी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर दोन साक्षदारा समक्ष करुन घेतले.त्यावर श्रीमती किन्नाके यांनी स्वतः स्वाक्षरी केली आहे व विक्रीपत्रास मान्यता दिली आहे. त्यानुसारच मी नगर परिषदे मध्ये सदर घरावर माझ्या हक्काची नोंद केली आहे. त्यामुळेच विद्युत मीटर देयक, गृह कर, इतर कर,असेसमेंट प्रत आणि इतर सर्व दस्ताऐवजांवर माझ्या नावाची नोंद आहे. असे असताना सुद्धा गिरीजा किन्नाके यांनी वार्डातील काही लोकांना हाताशी धरुन माझ्या विरोधात दि.22 मे 2020 रोजी संरक्षण भिंतीच्या बांधकामा संदर्भात न.प.भद्रावती येथे तक्रार दिली. तसेच आता पोलीस स्टेशन ला बनावट कागदपत्रे तयार करून घर हडप केल्याची तक्रार दिली. या दोन्ही तक्रारी खोट्या असून विनाकारण मला त्रास देण्याचा प्रकार आहे.तसेच श्रीमती गिरीजा किन्नाके ह्या दि.12 जुलै 2020 रोजी दोन इसमासह माझ्या घरी येऊन मला शिविगाळ करीत मला धमकी देऊन गेल्या.या प्रकाराची मी पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून न्यायलयात जाण्याची सल्ला दिला.
श्रीमती गिरीजा किन्नाके यांनी पत्रपरिषेद घेऊन माझ्यावर खोटे आरोप लावून समाजात माझी बदनामी केली आहे. त्यामुळे मी व्यथित झालो असून त्यांच्यावर न्यायालयातून 25 लाखाचा अब्रू नुकसानीचा ठोकणार आहे.तसेच माझ्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविणारी खोटी तक्रार केल्या प्रकरणी आणि पत्रपरिषदेतून बदनामी केल्या प्रकरणी श्रीमती गिरीजा किन्नाके यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. मी कोणतेही गैर कायदेशीर कृत्य केले नसून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे .माझी बदनामी केल्या प्रकरणी श्रीमती गिरीजा किन्नाके यांनी 7 दिवसांच्या आत माझी लेखी माफी मागावी व प्रसार माध्यमाद्वारे जाहीर करावे अन्यथा मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.असा इशाराही अब्बास अली बशारत अली यांनी यावेळी पत्रपरिषदेत दिला.
पत्रपरिषदेला मोहम्मद अन्वर,शेख जाकीर, मोहम्मद जाफर,अब्दुल मतीन आणि अब्दुल अकील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here