मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवशी ब्रह्मपुरी शहर शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

0
47
Advertisements

ब्रह्मपुरी – शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने , जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते व विधसनसभा संपर्क प्रमुख संजयभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ब्रम्हपुरी तर्फे ख्रिस्तानंद रुग्णालय ब्रम्हपुरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे_आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरी शहराच्या नगराअध्यक्ष सौ रिताताई उराडे उपस्थित होत्या सौ. रिताताई उराडे यांच्या हस्ते रिबीन कापून रक्तदानाच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
मा.उद्धवसाहेब यांच्या सूचनेला साथ देत असंख्य शिवसैनिकांनी रक्तदान केले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख नरूभाऊ नरड, तालुका संघटक रिंकुंभाऊ पठाण, विधानसभा समन्वक प्रा.श्याम करंबे सर, माजी तालुका प्रमुख नरेंद्रभाऊ गाडगीलवार, उप तालुका प्रमुख पराग माटे, जेष्ठ शिवसैनिक मिलिंदभाऊ भणारे, युवा सेना शहर प्रमुख अमोल माकोडे, युवा सेना तालुका प्रमुख आकाश शेंद्रे, आशिष गाडंलेवार, लोकेश अंबादे, तालुका संघटिका जयाताई कन्नाके, शहर संघटिका निर्मलाताई राऊत, सुरेखाताई पारधी तसेच सर्व शिवसेना_पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here