चंद्रपूर जिल्ह्याला २०० युनिट विज मोफत द्या आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपाल यांना निवेदन, नागपूर येथे भेट घेत केली सविस्तर चर्चा

0
136
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याला विज उत्पादक जिल्हा म्हणून विशेष दर्जा देत येथील नागरिकांना घरगुती वापरातील २०० युनिट पर्यंतची विज मोफत देण्यात यावी या करिता आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु असून सदर मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान आज सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नागपुरात असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले. यावेळी आ. जोरगेवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याशी सदर विषयावर सविस्तर चर्चा केली.

चंद्रपूर जिल्ह्यावर निसर्गाचे मोठे प्रेम असून चंद्रपूर हा जंगल व्याप्त जिल्हा आहे. या चंद्रपूर जिल्ह्याचा ४० टक्के भाग हा नैसर्गिक वन सपंतीने व्यापला आहे. असे असले तरी मानवनिर्मित प्रदुषणामुळे चंद्रपूर जिल्हा प्रदुषनाच्या बाबतीत देशात कुप्रसिध्द आहे. चंद्रपूरची प्रदूषण बाबतची ही ओळख वर्षांनुवर्षे कायम असून ती दिवसागणिक वाढत आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यात सर्वाधीक प्रदुषण हे थर्मल पॉवर एनर्जीमूळे होत. चंद्रपूरातील विद्युत केंद्रात थर्मल पॉवर एनर्जीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गरजेपेक्षा ३० ते ४० टक्के विज निर्मीती केली जाते. म्हणजेच, चंद्रपूरात जवळपास ५ हजार मेगावॅट पेक्षा अधिक विद्युत निर्मीती होते. यासाठी लाखो टन कोळसा जाळल्या जातो. याचा परिणाम म्हणून चंद्रपूरात प्रदुषणाचे प्रमाण वाढले असून या प्रदुषणाने जिवघेणा उंच्चाक गाठला आहे. परिणामी, चंद्रपूरातील नागरिकांची वयोमान ५ ते १० वर्षाने कमी होत आहे. असा वैद्यकीय अहवाल आहे. या जीवघेण्या प्रदुषणामुळे येथील नागरिकांना ह्दय रोग, त्वच्या रोग, श्वसनाचे आजार यासह इतर आजाराची लागण होत आहे. असे असतानाही २ रुपये १५ पैसे ते २ रुपये ५० पैसे प्रति युनिटच्या भावात तयारी होणारी विज चंद्रपूरकर ५ ते १५ रुपये प्रति युनिटच्या भावात खरेदी करत आहे. हा अन्याय असल्याचे आ. किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या लक्षात आणून दिले. तसेच विज उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्यासाठी सरकारने नियोजन करावे अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here