गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपूर हा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा राज्याला जोडला जातो. मोठ्याप्रमाणावर या रस्त्यावरून वाहतूक सुरू असते.काही वर्षापूर्वीच रस्ता डांबरीकरण करण्यात आला.मात्र आता याठिकाणी “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे” हे कळायला मार्ग नाही.मोटारसायकल स्वारांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुकावासी दररोज याठिकाणी विवीध कामांसाठी ये-जा करतात.कित्येक महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.दिवसेंदिवस लहान मोठे अपघात घडत असल्याचे पाहून जणू अपघाताची मालिकाच सुरू झाली की काय अशी भीती निर्माण झाली आहे.नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून परत असलेल्या धुळीमुळे महामार्ग लगतच्या शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्याची बोंब शेतकरी करीत आहे.संबंधीत विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन त्वरित रस्ता दुरुस्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
कोरपन्याचा रस्ता म्हणजे डोक्याला ताप,अपघाताची मालिका सुरू, राष्ट्रीय महामार्गाला “खड्ड्यांचे ग्रहण” रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता
Advertisements