स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 21 दुचाकीसह सोन्याचे दागिने जप्त, एकूण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
69
Advertisements

चंद्रपूर – स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 21 दुचाकीसह सोन्याचे दागिने जप्त करण्यात आली.

जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, रामनगर, सिंदेवाही, चिमूर, मूल, शेगाव, वर्धा, यवतमाळ पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे, सोबतच वरोरा येथील दाखल अपराध क्रमांक 331/2020 घरफोडीच्या गुन्ह्यात एकूण 2 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisements

या दोन्ही गुन्ह्यात दुचाकी वाहन चोरी प्रकरणातील अमर मेश्राम रा. वरोरा, मयूर मधुकर मेश्राम बाबूपेठ, घरफोडी प्रकरणातील शाहरुख असलम शेख, राकीब सिद्दीकी रा. दोन्ही माजरी यांना अटक करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here