मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला शिक्षक सेनेतर्फे 5 हजार मास्कचे वाटप

0
32
Advertisements

चंद्रपूर –  27 जुलै 2020 ला शिवसेनेचे पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडी चे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मानीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण राज्यात लाखो ठिकाणी विविध समाज सेवी कार्यक्रम घेण्यात आले.

याच निमित्ताने चंद्रपूर शहरात शिवसेना प्रणित शिक्षक सेने कडून भव्य मास्क वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी शहरात चौकाचौकात आणि बाजारपेठ मध्ये 5000 गरजूंना मास्क वाटप करण्यात आले. गांधी चौकातुन कार्यक्रम ची सुरवात करून नंतर गोलबाजार, जटपुरा गेट, तुकुम बाजार इतर 20 ठिकाणी हे मास्क वाटप करण्यात आले. वैश्विक महामारी कोरोना मुळे श्री उद्धव साहेबानी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा आदेश देऊन रक्तदान शिबिर, वैद्यकीय चाचणी, मास्क वाटप, गोर गरिबांना मदत करणारे कार्यक्रम घेण्याचा आदेश दिला होता त्यामुळे कुठले ही जाहिरात न करता हा कार्यक्रम सुद्धा सादगीत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी सह संपर्क प्रमुख श्री रामेश देशमुख हे उदघाटक म्हणून, माजी जिल्हा प्रमुख सतीश भिवंगडे मुख्य अतिथी म्हणून तर कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख जयदीप रोडे व शिवसेना जिल्हा संघटिका सौ. विजयालक्ष्मी रोगे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शालीक फाले, संजय वानखेडे, अरुण नाकट, शंकर बागेश्वर, उपजिल्हा संघटिका सौ. मायाताई पटले, शहर संघटिका सौ. वर्षा कोठेकर, युवासेना युवती संघटिका कु. रविना मडावी, गौरव जुमडे व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रम चा आयोजन शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here