घनकचरा व्यवस्थेचा फज्जा, विकास कामात भेदभाव, नगर पंचायतीच्या मनमानी कारभारामुळे विकासाला खीळ आबीद अलींचा आरोप.

0
158
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना नगर पंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामात अनियमित व नियंत्रणाचा अभाव असल्याने शासनाकडून विविध योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीच्या दुरुपयोगामुळे विकास कामांना खीळ बसत आहे.शहराचा सर्वांगीण विकास होत नसून याला नगर पंचायत जवाबदार असल्याचा आरोप जनस्त्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी केला असून सुरू असलेल्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.कोरपना ग्राम पंचयातचे रुपांतर नगर पांच्यातमध्ये झाल्यानंतर शहराच्या विकासा करिता मोठ्याप्रमाणावर निधी दिला जातो परंतू निधीचे प्रत्येक प्रभागात समान वाटप न होता आपल्या मर्जीनुसार सत्ताधीकार्यांकडून निधी खर्च केला जात असल्याने इतर प्रभागांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्या प्रभागातील समस्या आवासून उभ्या आहे. सत्ताधीकार्यांच्या पक्षपाती धोरणांमुळे शहराच्या विकासाला खीळ बसली असून कोरपनावासीयांमध्ये असंतोष पसरला आहे.2018,19 आणि 20 या वित्तीय वर्षात विविध योजनेतंर्गत 28 रस्ते व नाल्यांच्या कामाला मंजूरी मिळाली परंतू यापैकी 24 कामे एकाच कंत्राटदाराला देण्यात आली.मुद्दत संपूनही काम पूर्ण झाले नाही.तसेच बांधकाम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येत असताना देखील नगर पंचायतचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.यात एक नगरसेवक काम करीत असून पदाचा दुरूपयोग होत असल्याचा आरोप सुद्धा अली यांनी केला आहे.14 वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात येते.मात्र मागील 3 वर्षांपासून एकाच व्यक्तीला कामे देण्यात येत आहे.अंदाज पत्रकानुसार कामे केली जात नसून शासनाचे नियम व अटीला बगल देत असल्याने मोठ्याप्रमाणावर गैर व्यवहार सुरू आहे,यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.निव्वळ थातुरमातुर कामे करून कंत्राटदार दरमहिन्याला देयके उचल करतो आहे.यामध्ये मजुरांना अंदाज पत्रकानुसार वेतन मिळत नसल्याने त्यांचेही शोषण केले जात आहे.याविषयी तक्रारी करूनही नगर पंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.यामुळे शासनाचा लाखोंचा चुराडा होत असून घनकचरा अभियानाचा फज्जा उडताना दिसत आहे.याकामांची सुद्धा योग्य चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी अली यांनी केली आहे.सध्या पावसामुळे रस्त्यावरील खड्यात पाणी साचून रस्ते अक्षरशः चिखलमय झाले आहे.परंतू अजूनही नगर पंचयातने त्याठिकाणी मुरूम टाकले नाही.यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास नाहक त्रास होत असताना देखील़ नगर पंचयातचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आबीद अली यांनी केला असून या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here