“आदेश हा शब्द मी मागे घेते आणि विनंती करते”न.प.अध्यक्षा सौ.टेकाम. नगरपरिषद व व्यापाऱ्यांमध्ये वादळी चर्चेनंतर 3 ऐवजी 2 दिवस “जनता कर्फ्यू” माणिकगड कंपनी मात्र सुरूच, कोरोनासाठीच्या बैठकीत सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी

0
58
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन नगरपरिषदतर्फे तीन दिवसांच्या “जनता कर्फ्यू” चे आवाहन करण्यात आले होते. मात्र यासाठी व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता व कोणतेही शासकिय आदेश नसताना स्थानिक न.प.यांनी सरळ आवाहन केल्याने व्यापाऱ्यांमधे नाराजीचे वातवरण पसरले होते.याविषयी 26 जुलै रोजी शहरातील व्यापाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी नगरपरिषद येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.नगरपरिषदेने जनतेला केलेले आवाहन परत घेऊन विनंती करावी नंतरच पुढचे बोलू असा आग्रह व्यापारी बांधवांनी धरला.अखेर नगराध्यक्षा सौ.सवीता टेकाम यांनी “आदेश मी मागे घेते आणि विनंती करते” असे म्हटल्यावर चर्चेला सुरुवात झाली.सदर बैढकीत झालेली चर्चा काही वेळापुरती वादळी ठरली मात्र यानंतर व्यापारी आणि न.प.मध्ये सकारात्मक तोडगा काढण्यात आला.पुर्वी 3 दिवसाच्या ठरलेल्या जनता कर्फ्यूला 2 दिवसाचे करण्यात सर्वांनी सहमती दर्शवली.आता 27 ते 28(सोम व मंगळवार) हे दोन दिवस शहरात जनता कर्फ्यू असणार आहे.मात्र शहराच्या केंद्रस्थानी विराजमान माणिकगड सिमेंट कंपनी बंद करण्यास न.प.कडून असमर्थता दर्शवण्यात आली आहे.यावेळी न.प.अध्यक्षा सौ.सविता टेकाम,उपाध्यक्ष शरद जोगी,आरोग्य सभापती सौ.जयश्री ताकसांडे,गटनेता विक्रम येरणे,विरोधी पक्ष गटनेता सागर ठाकूरवार यांची मंचावर तर शहरातील व्यापारी व सत्ताधारी तथा विरोधी पक्ष नगरसेवक,नगरसेविकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.मात्र यावेळी भाजप या विरोधी पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित होते.विचारना केली असता बोलावण्यात आले नसल्याची माहिती एका भाजपच्या नगरसेवकांनी दिली आहे.येत्या दोन दिवस “जनता कर्फ्यू” लावून कोरोना संसर्गापासून जनतेला वाचवण्यासाठी नगरपरिषदेमध्ये सदर बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र याठिकाणी चक्क सोशल डिस्टंसिंगची सर्रासपणे ऐशीतैशी होताना दिसून आली हे मात्र विशेष.सदर बंदला नागरिकांनी सहयोग करावा अशी विनंती संबंधितांकडून करण्यात आली आहे.
——————————————-
“गडचांदूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना सदर बंद बद्दल विचारणा केली असता त्यांनी “मी नाही करत आहे.तुमच्याच गावाचे लोक करत आहे.शासनाकडून यासंबंधी कोणतेही पत्र नाही.नगराध्यक्षांनी सुद्धा पत्र नाही काढले त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.”अशी प्रतिक्रिया दुरध्वनीवरून दिली.
——————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here