Advertisements
गणेश लोंढे / नांदा फाटा
आज कारगिल विजय दिनानिमित्य एक झाड शहीदो के नाम कार्यक्रम नांदा फाटा येथील वार्ड क्र.५ मार्केट रोड आणि ओपन स्पेस येथे वृक्षारोपण करून राबविण्यात आला.
२६ जुलै १९९९ मध्ये कारगिल युद्धात विजय मिळवून देणाऱ्या आणि देशासाठी शाहिद झालेल्या जवानांना आदरांजली देण्यात आली या वृक्षारोपण कार्यक्रमात वार्ड क्र ५ मधील युवकांनी पुढाकार घेत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश पोतराजे,सोनू काळे,विजय ढवस,निलेश पेंदोर,उदय नगराळे,रुपेश अलोने,सचिन पेंदोर,रुपेश बोथले,मलेश अन्नलवार,पंकज ढवस,अशोक टेकाडे, वाघाडे इत्यादींनी सहकार्य केले.