एम्स मधील आयसीएमआरच्या डॉ.सी.जी.पंडित चे राष्ट्रीय अध्यक्ष ‘‘डॉ.एन.के.मेहरा’’ यांचे कोरोना विषयावर ‘‘वेबिनार’’, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या सर्व डॉक्टरांनी ‘‘वेबिनारचा’’ लाभ घ्यावा – हंसराज अहीर

0
53
Advertisements

चंद्रपूर – देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व मानवी नुकसान लक्षात घेता यापासून बचावात्मक उपायांचा योग्य पद्धतीने प्रचार व प्रसार होणे महत्वपूर्ण असतांना प्रत्यक्ष नागरिक व वैद्यकीय तज्ञ् यांच्यातील प्रमुख दुवा म्हणजे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर यांना एम्स दिल्ली येथील पूर्व संशोधन डीन आणि एम्स मधील आयसीएमआरच्या डॉ.सी.जी.पंडित चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एन. के. मेहरा यांचे मार्गदर्शन लाभावे यासाठी दि. २६ जुलै रोजी ‘‘वेबिनार’’ चे आयोजन डॉ. गंगाराम अहीर चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली आहे.
हंसराज अहीर यांच्या माध्यमातून यापूर्वी आयोजित विविध आरोग्य मेळाव्यातून डॉ. एन के मेहरा यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील डॉक्टरांना व नागरिकांना संबोधित केले आहे. डॉ. एन. के. मेहरा देशाच्या विज्ञानातील सर्वोत्कृष्ट शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासोबतच आयसीएमआर च्या सर्वोत्कृष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, रॅनबॅक्सी विज्ञान स्थापना पुरस्कार अशा इतर महत्वपूर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सदर वेबिनार चे आयोजन चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील आय एम ए, आयुर्वेदिक,होमिओपॅथिक अशा वैद्यकीय सहकाऱ्यांच्या सहकार्याने पूर्णत्वास येत असल्याची माहिती देत असतांना सर्व वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर यांनी कोरोना च्या लढाईत यश संपादन करण्यासाठी या वेबिनार चा लाभ घेण्याचे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here