भद्रावती,अब्बास अजानी
आधुनिक काळातील प्रदूषणामुळे पर्यावरणावर व पर्यायाने मानवी जीवनावर संकट आलेले आहे. मानवी जीवन सुसध्य होण्यासाठी पर्यावरण महत्वाचे भूमिका बजावत असते. त्यामुळे पर्यावरण टिकवण्यासाठी वृक्षरोपन करणे गरजेचे झाले आहे. असे मत वेकोली वणी क्षेत्रातील नायगाव खुल्या खाणीचे आर.के.आचार्य प्रबंधक यांनी व्यक्त केले.
नायगाव खुल्या कोळसा खाणीच्या क्षेत्रात वृक्षरोपन करण्यात आले या प्रसंगी पार पडलेल्या एक कार्यक्रमात ते बोलत होते.या वृक्षरोपनाचा शुभारंभ उपक्षेत्रीय दिनेश कुमार त्रिपाठी व खान प्रबंधक आर.के. आचार्य यांच्या शुभहस्ते वृक्ष लावून करण्यात आला.परिसराला शोभा आणण्यासाठी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नारळाची वृक्ष लावण्यात आली.या प्रसंगी खान परिसरात नारळाच्या वृक्षासोबतच जांब, आवळा,आंबा आदीसह विविध प्रकारची झाडे वृक्ष लावून त्याच बरोबर यावर्षी परिसरात 2 हजार वृक्ष लावून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी विजय कुमार, सुरक्षा अधिकारी प्रशांत पचपोर कार्यालय अधिकारी बी.आर. आवारी,वरिष्ठ लिपिक नारायण जांभुळकर,कामगार नेते श्रीकांत माहुरकर,सुनील बिपटे,रवीकांत गोडबोरीकर,मनीष खाडे,बंडू भोगडे, योगेश भोंगडे,प्रदीप खाडे व सुधीर ताजने,आदी सह मोठ्या संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.