“काय सांगू दादा गावाकडची गाथा”….! कवितेचा सोशल मीडियावर धुमाकूळ, नेमका कुणावर निशाना हे मात्र गुलदस्त्यात असले तरी “ये तो पब्लिक है,सब जानती है”

0
21
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरात सध्या सोशल मीडियावर एका कवितेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.शहरात ठिकठिकाणी “काय सांगू दादा गावाकडची गाथा” अशाप्रकारे उपहासात्मक चर्चांना उधाण आले आहे.सदर कवीता कोणत्या तरी नगरपरिषद नगरसेवक,ग्रामपंचायत सदस्य यांना उद्देशून लिहीण्यात आली असावी अशी शंका व्यक्त होत असून याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.काही का असेना मात्र सदर कवितेतील एकुण एक शब्द सत्य परिस्थिती सांगून जाते हे मात्र खरे.
हीच ती कवीता….!👇
—————————————————–
*काय सांगू दादा गावाकडची गथा* !
‌रात्रं दिवस करून निवडून दिले 👨‍🏭 यांना दादा !
‌ते गेले सत्तेवर बसले 🐒होऊन दादा !
*‌काय सांगू दादा गावाकडची गथा* !
‌आम्ही जातो मोठ्या हिमतीने अधिकारी करते खेदा !
‌हे नेते पाहत असतात टकाटका दादा !
*‌काय सांगू दादा गावाकडची गथा* !
‌आता आला आम्हाकडे कोरोना दादा !
‌मजा मारून राहिले अधिकारीच दादा !
*‌काय सांगू दादा गावाकडची गथा*!
‌सांगू कुणाला कळेना विरोधी जवळ ठेवेना !
‌आपलं म्हणून जावं तर काही समजेना !
*‌काय सांगू दादा गावाकडची गथा* !
‌काय झाली गम्मत मी केला अधिकाऱ्याला फोन !
‌अधिकारीच बोलले ताव मारून जोर जोर !
*‌काय सांगू दादा गावाकडची गथा*!
‌रात्रं दिवस मेहनत केली सारी गेली वाया !
‌एकही काम होत नाही सांगूनही जाते वाया !
*‌काय सांगू दादा गावाकडची गथा* !
—————————————————-
सदर कविता कुणावर हे जरी समजले नसले तरी “ये तो पब्लिक है सब जानती है”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here