लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त नागरिक, नियमांच उल्लंघन, आयोजकांवर गुन्हा दाखल

0
70
Advertisements

चंद्रपूर : मुल तालुक्यातील जानाळा येथे लग्नसमारंभात नियमबाह्यरित्या 50 पेक्षा जास्त लोकांना सहभागी करून, लग्नसमारंभात वधू-वरा सह उपस्थितांना कोरोनाची लागण झाल्यामुळे लग्न समारंभ आयोजकांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद ग्रामपंचायत सचिवाद्वारे पोलीस स्टेशन मुल येथे करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण अधिनियमांतर्गत विविध प्रतिबंध जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेले आहे. लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर प्रतिबंध केलेला आहे व त्या नियमाच्या अधीन राहून तहसीलदार मूल यांनी 29 जून रोजी होणाऱ्या लग्न समारंभाला परवानगी दिली होती. परंतु या लग्नसमारंभात 140 च्यावर लोकांची उपस्थिती होती. त्यापैकी एक कोरोना बाधित असल्याने अनेक लोकांना त्याचा संसर्ग झाला व जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत एकाकी वाढ झाली.

धार्मिक कार्यक्रम घरगुती पद्धतीने करावेत या कार्यक्रमांना 50 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई असल्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परवानगी देताना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्यामुळे लग्न समारंभ आयोजकांवर भां.द.वि. चे कलम 188,269 व 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू बाबत व्यापक प्रमाणात जनजागृती व मार्गदर्शक मोहीम राबवून अशा प्रकारच्या कार्यक्रमांस 50 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र न येता, तसेच प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुल तालुका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here