गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चिन पुरस्कृत “कोरोना” विषाणूपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी केन्द्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले.गेल्या चार महिन्यांपासून संचारबंदी लागू आहे,लोकांना काम नाही,कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.शासनाने वीज बिल,जीएसटीला स्थगिती दिली, कर वसूली,बँकेचे हप्ते थांबविण्यात आले असे असताना मात्र माणिकगड सिमेंट कंपनीच्या शाळेची मुजोरी “फी दिल्याशिवाय टीसी देणार नाही” ही एका अर्थी मौलिक शिक्षण अधिकारावर गदा आणणारी बाब असून शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून येत्या 30 जुलैपर्यंत मागणीनुसार पालकांना मुलांची टीसी द्यावी तसेच फी माफीला स्थगिती द्यावी अन्यथा 6 अॉगस्ट “जागतिक अन्न वस्त्र विरोधी दिनी” ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जनसत्याग्रह संघटनेतर्फे देण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे व्याज माफीचा निर्णय झाला, थकीत असताना शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याचा निर्णय झाला,विज बिलाचे हप्ते पाडण्यात आले,जबरन वसुली करू नये असे निर्देश अनेक शाळांना देण्यात आले असे असताना सुद्धा दुसरीकडे गडचांदूरातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या शाळेने याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांना फी भरल्याशिवाय टीसी देणार नाही असा तगादा लावला,हे कितपत योग्य.परंतु कामधंदे बंद असल्यामुळे फी ची रक्कम देऊ शकत नाही अशी परिस्थीती कोरोना संकटात आसताना माणिकगड सिमेंट कंपनीची इंग्रजी शाळा बिचाऱ्या पालकांना वेठीस धरत आहे.हा अन्याय सहन केला जाणार नाही तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन गरजू पालकांना टीसी परत करावी अन्यथा येत्या 6 अॉगस्टला विद्यार्थी व पालकांसह जनसत्याग्रह संघटना युनिट हेड कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करेल असा इशारा News34 च्या माध्यमातून देण्यात आला आहे.
जुलै 30 पर्यंत टीसी परत न दिल्यास 6 अॉगस्टला ठिय्या आंदोलन, विद्यार्थी व पालकांसह जनसत्याग्रह संघटना रस्त्यावर उतरली, माणिकगड सिमेंट कंपनी शाळेला इशारा
Advertisements