शाळेची “फि” भरल्याशिवाय “टीसी” मिळणार नाही, माणिकगड सिमेंट इंग्रजी शाळेचा प्रताप, अशा शाळांवर कारवाई करा, मनसे आक्रमक

0
47
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली,लोकांचा रोजगार बुडाला,जीवन जगणे कठीण झाले असताना शाळेची फी भरा अन्यथा “टीसी” मिळणार नाही अशी तंबी गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीतील इंग्रजी शाळा मुख्याध्यापीकांनी एका पालकाला दिल्याची संतापजनक घटना घडली असून सदर प्रकरणाची व्हिडिओ फुटेज सुद्धा उपलब्ध आहे.
सविस्तर असे की,गडचांदूर येथील बंडू वैरागडे यांची मुलगी येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या इंग्रजी शाळेत इयत्ता 7 व्या वर्गात शिकत होती.सध्या कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळल्याने यापुढे शैक्षणिक खर्च परवडत नाही म्हणून बंडू यांनी शाळेत जाऊन मुलीची टीसी मागितली मात्र अगोदर चार महिन्याची शाळेची फी 8810 व्याजासह भरा अन्यथा “टीसी” मिळणार नाही अशी तंबी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिली आहे.लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली होती.शासनाने सुद्धा शाळेच्या फी संबंधी निर्देश दिले असताना चार महिन्याची फी व्याजासह कशी भरायची हा प्रश्न उपस्थीत होत आहे.सदर प्रकरणी संभाषणाची व्हिडिओ क्लिप वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.या सर्व गोष्टींचा मनसेच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करत माणिकगड सिमेंट कंपनी इंग्रजी शाळा व इतर ठिकाणच्या शाळेत असे गैरप्रकार घडत असतील तर संबंधित विभागाने त्वरित कारवाई करण्याची गरज असून अन्यथा तिव्र आंदोलन उभारण्याचा इशारा मनसेच्या राजूरा विधानसभा अध्यक्ष महालींग कंठाळे यांनी News 34 ला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे.यासंबंधीची तक्रार जिल्हाधिकारी,शिक्षणमंत्री तसेच इतर संबंधित विभागाला दिल्याची माहिती देण्यात आली आहे.यावेळी कंठाळेसह कोरपना तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे,गडचांदूर विद्यार्थी सेना शहराध्यक्ष ऋषीकेश भारती यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here