चंद्रपूर – चंद्रपूर शहरालगत चीचपल्ली जवळ एका फार्म हाऊस मध्ये रामनगर पोलिसांनी धाड मारत बनावटी सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर धाड मारली त्यामध्ये एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्या कारखान्यात मशिनद्वारे बनावटी सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्यात येत होते, लॉकडाऊन काळापासून हा बनावटी सुगंधित तंबाखू बल्लारपूर व चंद्रपूरच्या बाजारपेठेत सर्रास पणे विकल्या गेला होता.
पोलिसांनी या धाडीत कांबळे, पटेल व शहादाब शेख यांना अटक केली, परंतु या तिन्ही आरोपींपैकी कुणी मुख्य सूत्रधार आहे का? या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य सुत्रधाराला अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता इरफान शेख यांनी केली आहे.
जर खरंच हे तिघे त्या बनावटी सुगंधित तंबाखूचा व्यापार करणारे मोठे व्यापारी असते तर स्वतः त्या फार्म हाऊस वर ते स्वतः सुगंधित बनावटी तंबाखू निर्माण करीत नसते, शहदाब शेख हा त्या ठिकाणी काम करणारा साधारण व्यक्ती होता अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे या तिघांच्या मागे सूत्रधार कुणी दुसरे आहे.
त्या सुत्रधाराला पोलिसांनी बेड्या ठोकून समाजात बनावटी सुगंधित तंबाखूच्या नावाने विष पेरणाऱ्याला अटक करावी अशी मागणी यावेळी इरफान शेख यांनी यावेळी केली.