सोशल डिस्टनसिंगचे नियम सामान्य नागरिकांसाठीच का? शहर भाजप अध्यक्षांच्या उपस्थिती मध्ये नियमांचा फज्जा

0
61
Advertisements

चंद्रपूर – राम मंदिर निर्माण केल्याने कोरोना जाणार का? राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या या वक्तव्याचा भाजपने तीव्र आक्षेप घेत संपूर्ण राज्यात पवार यांना पत्र पाठवण्याचा सपाटा सुरू केला आहे.

देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे, अश्यातच बहुप्रतिक्षेत राम मंदिराच भूमिपूजन 5 ऑगस्ट ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, कोरोना काळात भूमिपूजन महत्वाचं आहे का, आधी कोरोना देशात वाढत आहे त्यावर नियंत्रण करा, मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही असे विधान शरद पवार यांनी केल्यावर भाजपने सर्वत्र निषेध कार्यक्रम सुरू केला.

कोरोना काळातही भाजप शरद पवार यांचे निवासस्थानी जय श्री राम घोषवाक्याचं पत्रे पाठवून निषेध करण्यात येत आहे.

पत्र पाठविण्याचं काम सुद्धा भाजप सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवीत करीत आहे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, भाजप शहर अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये पत्रे पाठविण्यात आली.

नागरिकांना सोशल डिस्टनसिंग चे नियम सांगायचे व स्वतः नियमांना डावलून काम करायचं, पत्र पाठविण्याच्या वेळेस सोशल, डिस्टनसिंग व मास्क याचे नियम कुठेही पाळल्याचे दिसत नाही.

प्रशासन यावर गप्प का, त्यांनी यावर लक्ष देऊन कारवाई करायला हवी, नियम हे सामान्य नागरिकांसाठी असतात का? राजकीय यातून मुक्त आहे काय असा प्रश्न सामान्य जनतेने उपस्थित केला आहे.

सामान्य नागरिकांकडून मास्क नसल्यास 200 रुपयांचा दंड लावण्याची कारवाई चंद्रपूर महानगरपालिका द्वारा करण्यात येत आहे तर यावेळी भाजप कार्यकर्ते पालिकेच्या नजरेतून वाचले कसे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here