गडचांदूरकरांनी शासनाचे नियम पाळून सहयोग करावा. न.प.उपाध्यक्ष शरद जोगी यांचे आवाहन

0
90
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” विषाणूने आजघडीला अक्षरशः थैमान घातले असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.गडचांदूर शहरात सुद्धा रूग्ण वाढत असल्याचे चित्र असून नुकतीच जिल्हाधिकारी यांनी स्थानिक नगरपरिषदेला भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांनी अधिक सावध राहणे गरजेचे असून शहरात तपासणीची विशेष मोहीम राबवत असल्याचे म्हटले आहे.शहरात लॉकडाऊन लावण्या संबंधीचे माणस सदर बैठकीत उपस्थित काही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती असून शहरात गर्दी टाळावी,घरा बाहेर पडताना मास्कचा वापर करावा याविषयी इतरांनाही सांगा,शासनाच्या नियमांचे पालन करा जेणेकरून कोरोनाची लागन व रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ नियंत्रणात आणता येईल.यासाठी शहरवासीयांनी आम्हाला सहयोग करावा अन्यथा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आवाहन न.प.उपाध्यक्ष शरद जोगी यांनी News34 च्या माध्यमातून शहरवासीयांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here