बल्लारपूर – नवनिर्वाचित राज्यसभा खासदार यांच्या शपथविधी मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी चा उदघोष केल्याने राज्यसभा सभापती वेंकय्या नायडू यांनी खासदार भोसले यांना हे माझं चेंबर आहे, इथे कोणत्याही प्रकारचे स्लोग्न चालणार नाही असे म्हणत खडसावले.
नायडू यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्र राज्यात पडताना दिसले, चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर उपविभागीय कार्यालयासमोर वेंकय्या नायडू यांचा तीव्र शब्दात निषेध केला.
संदीप गिर्हे यांनी यावेळी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे, त्यांच्याबद्दलच्या घोषवाक्याने आम्हाला शक्तीदायक प्रेरणा मिळते, भाजपला निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव चालते पण कुणी उदघोषणेचा त्रास होतो नायडू यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे.
आम्ही जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांचा निषेध करतो.
शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नायडू यांच्या विरोधात निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी सिक्की यादव, प्रमोद पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.
भाजपला निवडणूकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चालतात तर त्यांच्या उदघोषणा का नाही – संदीप गिर्हे
Advertisements