अल्पसख्यांक समाजासाठी “मॉ फातीमा” आवास योजना राबवा, सैय्यद आबीद अली यांची मागणी

0
68
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
केन्द्र व राज्य शासन पुरस्कृत सर्वांसाठी हक्काचा निवारा या उपक्रमांतर्गत पुर्वीच्या घरकुल योजनेच्या अटी व निकषात बदल करून 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे धोरण तयार करून विविध निधी स्त्रोतातून योजना तयार करून वेगवेगळ्या घटकांचा घराचा प्रश्न सोडविण्याचा शासनाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे.या उपक्रमाचा भाग म्हणून राज्यातील मागास आर्थीक कमकुवत,अनुजाती जमाती,भटके विमुक्त,धनगरसह इतर मागासलेल्या कुटुंबासाठी गृह निर्माण व विशिष्ट कल्याण निधीतुन शबरी आवास योजना,रमाई आवास योजना,आदीम कोलाम वसाहत विकास योजना,प्रधानमंत्री आवास योजना,इंदिरा आवास योजना,राजीव गांधी निवारा योजना,यंशवतराव चव्हाण सामूहिक आवास योजना नुकतीच नव्याने शासनाने घोषित केलेली अहिल्याबाई होळकर घरकुल योजना हे प्रशंसनीय उपक्रम शासन राबवित असताना मात्र अल्पसंख्याक मुस्लीम समाज दुर्लक्षीत झाल्याने ग्रामीण व शहरी भागतील अनेक मुस्लीम वस्तीत झोपड्या,सांडपाणी अव्यवस्थाचे दर्शन,आर्थीक व मागासलेल्या अवस्थेचे चित्र दिसून येईल.सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करण्याचा शासनाचा हेतू अभिनंदनीय असला तरी मुस्लीम समाजाच्या आर्थिक कमकुवत निवाऱ्याची दयनीय अवस्था असलेल्या कुटुंबाना आधार व घरकुल योजना राबविण्याची गरज असताना हा समाज दुर्लक्षित असल्याची खंत समाजात स्पष्ट दिसते.ग्रामीण व शहरी भागात घरकुलाच्या अनेक योजना अमलात असल्या तरी मुसलीम अल्पसख्यांक वर्गवारी व अटी-शर्ती आरक्षणाचा फटका बसत असल्याने लाभापासून वंचित रहावे लागते.अनेक झोपडपट्ट्या व गावात अनेक कुटुंब झोपडीत गैरसोयीच्या ठिकाणी वारा,पाऊस व उन्हाचे चटके सहन करीत झोपडीच्या आधारे प्लॅस्टिक,ताटपत्री तर कुठे टिनाचे छप्पर उभारून वास्तव्य करत असतात.समाजामध्ये गरिबी,आर्थिक मागासलेपणा या कारणाने सामाजीक,शैक्षणिक क्षेत्रात समाज पिछडला इतर योजनांच्या धर्तीवर अल्पसंख्याक समाजासाठी 1848 मध्ये भिलवाडा येथे मुलींच्या शिक्षणाची पहली शाळा उघडून महात्मा ज्योतीबा व सावित्रीबाई फुले यांना शाळा सुरु करण्यास जागा व राहण्याची व्यवस्था घराचे छत देणाऱ्या उस्मान यांची बहीन “मॉ फातीमा” समाजाचा विरोध पत्करून मुलींची पहली शाळा व आधुनिक भारताच्या मुस्लीम समाजाच्या प्रथम शिक्षिका म्हणून मॉ फातीमा ह्या समाजाला व मुस्लीम स्त्री शिक्षणात प्रेरणा देणारा एक आदर्श निर्माण केला.शासनाने अल्पसंख्याक समाजासाठी ग्रामीण व शहरी भागात विषेश निधी व योजना तयार करून मॉ फातीमा वैयक्तीक लाभार्थी आवास व सामूहिक वसाहत योजना राबविण्यासाठी धोरण ठरवावे “सबका साथ सबका विकास” प्रमाणे सर्वांसाठी 2022 पर्यंत हक्काचे घर ही घोषणा व शासनाचा उद्देश सार्थक ठरावा अशी मागणी जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी राज्याचे मुख्यमंत्री,गृह निर्माणमंत्री,अल्पसख्यांक कल्याणमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here