Advertisements
गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीच्या निमित्ताने गडचांदूर येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भोंगळे यांच्या स्वगावी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी भोंगळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांचे छायाचित्र त्यांना भेट म्हणून देण्यात आले.याच दरम्यान विविध मुद्दे तथा संघटनात्मक विषयांवर चर्चा करून “बूथ संपर्क अभियानाचा” अहवाल देण्यात आला. याप्रसंगी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार, नगरसेवक रामसेवक मोरे,अरविंद डोहे, माजी नगरसेवक निलेश ताजने,संदीप शेरकी,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,महादेव एकरे यांची उपस्थिती होती.