चंद्रपूर – मी दारूबंदीचा समर्थक आहो माझें कोणत्याही तस्करासोबत नातेसंबंध नाही, मागील 20 वर्षांपासून मी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहोत, माझी समजात बदनामी व्हावी असा माझ्या राजकीय विरोधकांचा डाव होता म्हणून एका दारू तस्करासोबत माझे नातेसंबंध आहे अशी अफवा सोशल माध्यमातून पसरविल्या गेली.
2 दिवसआधी साखरवाही येथे अंकित डाहूले या युवकाला दारू तस्करीत अटक करण्यात आली, अंकित हा भाजप तालुका अध्यक्ष नामदेव डाहूले यांचा पुतण्या आहे अशी बदनामीकारक बातमी आल्याने माझी समाजात बदनामी झाली असल्याची प्रतिक्रिया भाजप तालुकाध्यक्ष नामदेव डाहूले यांनी news34 सोबत बोलताना दिली.
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कोणतेही वाईट काम केले नाही, राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून मी सामान्य जनतेच्या उद्धारासाठी नेहमीच पुढाकार घेतला, साखरवाही या गावी डाहूले नाव हे माझेच नाही त्या नावाचे अनेक लोक त्या भागात राहतात, तो दारू तस्कर सुद्धा डाहूले या नावाचा होता पण त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही.