ऑनलाईन पद्धतीने वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षा घ्या – रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशनची मागणी

0
210
Advertisements

चंद्रपूर –  भारतातच नसून संपूर्ण जगात करोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उन्हाळी-२०२० च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि आता वैद्यकीय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३ ऑगस्ट पासून परीक्षा पूर्णआयोजिय करण्याचे वेळापत्रक विविध विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे.
करोना प्रादूर्भाव पासून सर्वत्र जनमानसात भीतीचे वातावरण असताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देणे हे कितपत सुरक्षित आहे यात आम्हाला शंका आहे म्हणून रिपब्लिकन स्तुडेंट फेडरेशन,चंद्रपूरच्या वतीने रिपब्लिकन नेते प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना जिल्हाअधिकारी यांच्या मार्फत राजस खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
मागील 4-5 महिन्यापासून न्यायालयाचे कामकाज असो की राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठका किंवा अन्य शासनाच्या बैठका या सर्व विडिओ कॉन्फरन्स द्वारा होत आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांना करोना पासून सुरक्षित ठेवायच असेल तर ऑनलाईन पद्धतीने सर्व खबरदारी घेऊन परीक्षा घेण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांनच शैक्षणिक नुकसान होणार नाही व त्यांना करोनाचा प्रादुर्भाव सुद्धा होणार नाही
या शिष्टमंडळात शुभम शेंडे,नयन अलोणे ,सुरभी मोडक, दिक्षा घडसे,कपिल गणवीर, प्रज्योत बोरकर, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here