स्थानिक प्रशासनाचा गलथानपणा आणि शहरात वाढला कोरोना – भाजपचा आरोप

0
189
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” नामक विषाणूने अख्ख्या जगाला नाकीनऊ आणले असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनप्रशासन अक्षरशः जीवाचे रान करीत असल्याचे चित्र आहे.गडचांदूर शहरात सुरूवातीला जेव्हा कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता तेव्हा येथील संबंधित कोरोना योद्धा अहोरात्र काम करीत असल्याचे दिसत होते.परंतु आता रुग्ण वाढत असताना यांच्याकडून अक्षम्य हलगर्जीपणाचे दर्शन घडत असल्याचे आरोप करत हल्ली घडत असलेल्या प्रकारांवर उपाययोजना करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी गडचांदूर शहर भाजपच्या वतीने कोरपना तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात निवेदन देण्यापर्यंत एकूण 8 कोरोना रुग्ण सापडले.यापैकी नुकतेच 19 जुन रोजी मिळालेला रुग्ण हा अमरावतीतून गडचांदूर येथे त्याच्या सासुरवाडीला आला होता.तो येताच नियोजित ठिकाणी डॉक्टरांनी त्याची तपासणी करून स्वॅबचे नमुने घेऊन नियमानुसार त्याला येथील बालाजी सेलिब्रेशन नामक कारेंटाईन सेंटर येथे कारेंटाईन केल्याची माहिती आहे.परंतु नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख स्वप्नील पिदूरकर व कर्मचारी प्रमोद वाघमारे यांनी त्या रुग्णाला येथील अतिशय दाट वस्ती असलेल्या प्रभाग क्रं.7 याठिकाणच्या सासुरवाडीला जाण्याची परवानगी दिली.सदर ठिकाणी बहुतेक सर्वच मोलमजुरी करणारे आहे.17,18 व 19 जुलै रोजी अंदाजे तीन वाजेपर्यंत सदर रुग्ण हा राजरोसपणे शहरात फिरत असल्याची माहिती असून 19 जुलै रोजी सकाळी 9/30 वाजता रिपोर्ट येऊनही सायंकाळी अंदाजे 4 ते 5 वाजताच्या सुमारास त्याला ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे घेऊन गेले.त्याच्या घरातील व्यक्ती व शेजाऱ्यांना तपासणीसाठी बोलवण्यात आले.तेव्हा ती मंडळी पायदळ बाजारातून गेली आणि पायदळच घरी येताना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत आले.तेव्हा ते कित्येक लोकांच्या संपर्कात आले असावे याची कल्पनाच केलेली बरी.वास्तविक पाहता यांना नेतेवेळी गाडीचा वापर आणि रूग्णालय अथवा नगरपरिषदेचा एखादा जबाबदार व्यक्ती सोबत असने गरजेचे होते.असे निवेदनात नमूद करण्यात आले असून नियमानुसार लगेच सदर परिसर सील करून प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आले.यामुळे तेथील मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करत 14 दिवस आणि अधिकचे रुग्ण आढळल्यास पुन्हा काही दिवस घराच्या बाहेर निघणे बंद झाले हे मात्र विशेष.हा सर्व प्रकार स्थानिक न.प.प्रशासन तसेच संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप करत सदर रुग्णाला नियोजीत ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात ठेवले असते तर तो परिसर कंटेंन्टमेंट झोन घोषित करण्याची गरज भासली नसती तसेच इतर लोकांची तपासणी,परिसर सील करण्यासाठी नगरपरिषदेचा खर्च व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला नसता ही बाब सुद्धा निवेदनातून मांडण्यात आली आहे.स्वछता ठेकेदाराचे मजूर गेल्या 15 दिवसांपासून शहराच्या स्वच्छतेला तिलांजली देऊन याच कामात गुंतल्याने स्वच्छतेकडे सर्रास दुर्लक्ष होत असून शहरात बऱ्याच प्रभागात दुर्गंधी पसरत आहे.कोरोना सोबतच आता लोकांना अनेक रोगांचा सामना करण्याची वेळ येणार तसेच यापूर्वी सुद्धा प्रभाग क्रं.3 मधील डॉ.खेकडे परिसरात रुग्ण आढळल्याने तो परिसर सील करण्यात आले मात्र तेथील काही नागरिक शासन नियमांचे उल्लंघन करत क्षेत्राच्या बाहेर जाऊन विविध कार्यक्रमात उपस्थीत राहत होते.परंतु नगर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही जेव्हा काही नागरिकांनी नगरपरिषदला यासंदर्भात विचारणा केली तेव्हा केवळ दोन व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाई करण्यात आली.याच बरोबर बरेच आरोप गडचांदूरातील न.प.प्रशासन व डॉक्टरांवर करण्यात आले असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागले असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देताना भाजपचे गडचांदूर शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे,माजी नगरसेवक नीलेश ताजने,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,संदीप शेरकी,हरीश घोरे,अमोल आसेकर,विशाल गज्जलवार इतरांची उपस्थिती होती.
———————//—————–
*सदर प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गडचांदूर न.प.आरोग्य विभागाचे अधिकारी स्वप्निल पिदूरकर यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा संपर्क झाला नाही.नंतर व्हॉट्सअॅप वर मॅसेज पाठवून ही काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही.*
—————————————-
सदर निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले असून माजी मंत्री सुधीर मुंनगंटिवार,
‌उपविभागीय अधिकारी राजूरा,जिल्हा शल्य चिकित्सक,तहसीलदार कोरपना यांना देण्यात आले आहे.आता शासन याप्रकरणी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here