30 हजाराच्या नादात अडकले एसीबीच्या जाळ्यात

0
279
Advertisements

चिमूर – नियमबाह्य काम केल्याने भिसी ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी येथील राजेश येवले यांना निलंबित करण्यात आले होते, मागील 2 ते 3 वर्षांपासून त्यांची चौकशी सुरू आहे.
ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी येवले यांची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना केली होती त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी त्या प्रकरणाची चौकशी चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमने यांच्याकडे होती.
हे प्रकरण दाबण्यासाठी विस्तार अधिकारी हुमने व भिसी सरपंच योगिता गोहणे, उपसरपंच लीलाधर बन्सोड यांनी येवले यांचेकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली.
चौकशी प्रकरण मिटविण्यासाठी येवले हे पैसे देण्यास तयार नसल्याने त्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
22 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून विस्तार अधिकारी हुमने, सरपंच गोहणे व उपसरपंच बन्सोड यांना 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.
पुढील तपास चिमूर पोलीस, लाचलुचपत विभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here