चंद्रपुरातील लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपला, तर दुसऱ्या टप्प्यातच नागरिकांनी सर्रास नियमांची केली पायमल्ली

0
37
Advertisements

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी लोकं नियम धाब्यावर बसवून बिनधास्त वागत असल्याचं दिसून आलं. बाजार समितीत हा गंभीर प्रकार आज दिसला. जिल्ह्यात 17 जुलैपासून 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित आहे. पाच दिवसांचा पहिला टप्पा काल संपला. या पाच दिवसात औषध दुकानं वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती. भाजीपाला विक्रीलाही बंदी होती. आज यात शिथिलता मिळताच किरकोळ विक्रेते, ठोक व्यापारी आणि लोकांची तोबा गर्दी बाजार समितीत उसळली. गेले पाच दिवस भाजीविना राहणाऱ्या लोकांचा बांध फुटल्याचं चित्र इथं होतं. सोशल डिस्टन्स, मास्कचा अभाव यावेळी दिसून आला.

कोरोना सारख्या विषाणूला हरवायच असेल तर नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळायला हवे, परंतु काही मोजक्या नागरिकांद्वारे नियमांचे उल्लंघन होत असून त्यामुळे हा कोरोना जिल्ह्यात पाय पसरताना दिसत आहे.

एकेकाळची संख्या 10 ते 12 असताना आज तब्बल जिल्ह्यात 309 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here