वरोरा : चंद्रपूर जिल्हा नेहमी वीज प्रकल्पा करिता अग्रगण्य क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण सहन करावं लागत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळे गंभीर आजार होत आहे. याची जण असल्यामुळे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर पुढे येऊन जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पाला चालना मिळण्याकरिता आग्रही राहिले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांच्या सोबत व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून संवाद साधून भद्रावती येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी केली. त्यांनी दखल घेत भद्रावती तालुक्यातील कचराळा येथे १४५ मेगावँटचा सौर ऊर्जा प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याने नेहमी उद्योग, औष्णिक विदयुत प्रकल्प यासाठी जगाचा नकाशावर स्थान मिळविले आहे. येथे मोठ्या प्रमाणात प्रदुषणाच्या प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हातील प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर होणार परिणाम नेहमीच चिंतेच्या विषय ठरत आहे. जिल्ह्यातील नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प येऊन जिल्हातील वनसंपदेच्या रास होणार होता. परंतु हे टाळण्यासाठी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्ह्यात प्रदूषण होणारे उद्योग न आणता पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल असे उद्योग आणावे अशी आग्रही व लोकाभिमुख मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांच्या पुढे ठेवली. त्यांनी या मांगणीच्या सकारात्मक निर्णय घेऊन १४५ मेगावँटचा सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली.
या ग्रीन प्रोजेक्ट मुळे प्रदूषणविरहित वीज निर्मिती करून चंद्रपूर जिल्हातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती चालणार मिळून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. अशा प्रकारचे सौर ऊर्जा प्रकल्प अन्य भागात देखील उभारण्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जनतेला दिली.