चंद्रपूर – घुग्घुस ताडाली मार्गावरील साखरवाही गावातील एक गोठ्याजवळ टाटा सफारी क्रमांक एमएच ३४ एए ९२८८ हि दिनांक २१/७/२०२० पहाटे १ ते २ वाजता दरम्यान संशयस्पद रित्या उभी होती गुप्त माहिती आधारे सापळा रचुन टाटा सफारीची तपासणी केली असता त्यात १० पेटी अवैध देशी दारु आढळुन आली. आरोपी अंकित विठ्ठल डाहुले (२६) रा. साखरवाही यास अटक केली. १० पेटी देशी दारु किंमत १ लाख व वाहन किंमत ५ लाख असा एकुण ६ लाख रुपया चा मुद्देमाल जप्त केला.
विशेष म्हणजे दारू तस्करी करणाऱ्या आरोपींचे त्या भागातील भाजपच्या पुढाऱ्या सोबत नातेसंबंध असल्याची माहिती आहे, तो पुढारी भाजपचा तहसील अध्यक्ष आहे, विशेष म्हणजे दारूबंदी ही भाजप सरकारच्या कार्यकाळात झाली होती, या दारूबंदीचा फायदा अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
हि कारवाही पोलीस निरिक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनात दादाराव तळवेकर, चंदु ताजणे, सुभाष कुळमेथे,संदीप वासेकर, सुनील वाकडे, यांनी केली आहे.