त्या भागात दारूची तस्करी “नको रे बाबा”, दारू तस्करांना ठाणेदाराची धास्ती

0
130
Advertisements

चिमूर – चिमूर पोलिसांनी लागोपाठ चालवलेल्या अवैद्य दारू विक्रेते कारवाही मूळे चिमूर परिसरात शांतता असतानाच कायद्याला न जुमानता काही दारू विक्रेते लपून छपून दारू विक्री करीता नवीन नवीन व्यक्ती मार्फत दारू विक्री करीत असतात अशातच माहिती मिळाली की वारंवार केसेस असलेला अवैद्य दारू विक्रेता कृष्णा नारनवरे हा हेमंत केशव केलझरकर यास देशी व मोहदारू विक्रीकरिता देण्यासाठी स्वतःचे चारचाकी गाडीने येत आहे या माहितीवरून त्यांचेवर पाळत ठेऊन असताना कृष्णा नारनवरे याने हेमंत केलझरकर यास देशी दारू विक्रीकरिता देत असताना पोलिसांनी धाड टाकताना पाहून आरोपी गाडी सोडून फरार झाले तेव्हा जागेवर देशी दारू, मोहा दारू, व फोर्ड फिएसता क्र MH 02 AY 9424 असा एकूण 3,32,800 रु चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी हेमंत केशव केलझरकर वय 45 वर्ष रा चिमूर यास अटक करण्यात आली असून आरोपी कृष्णा नारनवरे रा चिमूर याचा शोध घेणे सुरू आहे.
सदरची कारवाही श्री. अनुज तारे, उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे , ठाणेदार चिमूर यांचे मार्गदर्शनात पोहवा विलास निमगडे , नापोशी किशोर बोढे, पोशी सचिन खामनकर, सचिन गजभिये यांनी पार पाडली.

चिमूर तालुक्यात अवैध दारू तस्कर हे विविध युक्त्या आखून तस्करी करीत होते परंतु त्यांच्या युक्त्याना पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे हे हाणून पाडत असल्याने आता दारू तस्कर सुद्धा चिमूर क्षेत्रात अवैध दारूचा व्यापार करण्यास घाबरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here