पावसामुळे पडझड झालेल्या घरांची आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी, नुकसान ग्रस्त कुटुंबियांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मदत

0
57
Advertisements

चंद्रपूर – मागील तिन ते चार दिवसांपासून शहरात पावसाची संतत धार सुरू आहे. याचा फटका अनेक घरांना बसला असुन घरांची पडझड झाली आहे. दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांना बोलावून पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून घेत तात्काळ शासकीय मदत देण्याच्या सूचना केल्यात. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार गादेवार व तलाठी वर्भे यांची उपस्थिती होती.

मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात पावसाचा जोर वाढला असून पावसाची संतत धार सुरु आहे. सतत सुरु असलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक घरांची पडझड झाली आहे. नागरिक कोरोना विषाणूशी लढत असतांना आता नियतीचा प्रकोपही त्याला झेलावा लागत आहे. या पासवसामूळे अनेकांच्या झोपड्या शतीग्रस्त झाल्या आहे. तसेच घरावरचे टिनपत्रे उडाल्याच्याही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कवेलूंच्या घरांनाही या पावसाचा चांगलाच फटका बसला असून अनेकांचे आर्थिक नूकसान झाले आहे. विशेष म्हणजे शामनगर, जलनगर, बाबूपेठ, या भागातील नागरिकांचे या पावसामूळे मोठे नूकसान झाले आहे. दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे लक्षात आले . अशात आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचणेनंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नुकसानग्रस्त कुटुंबियांना किराणा व धान्याची मदत करण्यात आली आहे. तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर अधिकाऱ्यांसह आ. जोरगेवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत पंचनामे करून घेतले तसेच शासकीय मदत तात्काळ देण्याचे निर्देशही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांना दिले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वदंना हातगावकर] विश्वजीत शाहा] जोसेफ] राशिद हुसैन] प्रतिक शिवणकर] बबलू मेश्राम] गौरव जोरगेवार] कल्पना शिंदे] दुर्गा वैरागडे, विमल काटकर] स्मिता वैद्य आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here