राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर

0
288
Advertisements

गडचिरोली:-महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ द्वारा दरवर्षी महाराष्ट्रातील विविध आस्थापनेत आपले दैनंदिन कर्तव्य बजावून
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यीक, सांस्कृतिक, कला-क्रिडा, संघटना अादीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतो.हे सर्व गुणवंत कामगार समाजासाठी नेहमी राज्यावर, देशावर ज्यावेळी अस्मानी संकट व नैसर्गीक आपत्ती ओढवते त्यावेळी शासनाला सर्वोत्तोपरी सहकार्य करतात. अशा कामगारांना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना कौतुकाची थाप मिळावी म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने “गुणवंत कामगार कल्याण” पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.अशाच गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्तींची राज्यस्तरीय *राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य* च्या नावे संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. त्या राज्यस्तरीय संघटनेचे नुकतीच शासकीय नोंदणी सुद्धा करण्यात आली.
सद्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संघटनेची नुकतीच आॅनलाईन काॅन्फरन्सद्वारे बैठक संपन्न झाली.
या बैठकीत पुढील पाच वर्षासाठी खालीलप्रमाणे राज्य कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
*राज्य गुणवंत कामगार असोसिएशन*
(कार्यक्षेत्र-महाराष्ट्र राज्य) या संघटनेच्या अध्यक्ष पदी सुरेश केसरकर (कोल्हापूर) तर उपाध्यक्ष पदी (विभागानुसार) नरेंद्र रहाटे (चंद्रपूर) , अच्युतराव माने (उस्मानाबाद), तात्यासाहेब भोसले (सोलापूर), दिलीप घोलप (मुंबई उपशहर) तसेच सचिव पदी स्वानंद राजपाठक (पुणे) ,सहसचिव पदी मुकुंद कोकणे (औरंगाबाद), खजानिस पदी सुहास वड्डीकर (सांगली) , तर सह खजानिस देवराव कोंडेकर- (गडचिरोली) तसेच सदस्य पदी अनिल मावळे (अकोला), अरुणकुमार आठवले (अमरावती), सोपान बांगर (अहमदनगर), महादेव चक्के (कोल्हापूर), नितीन गादेवार(गोंदिया), शैलेंद्रनाथ इंगळे (जळगाव), रामेश्वर वरखडे (जालना), केरबा डावरे (ठाणे), भगवान पाटील (धुळे), गुलाबराव सोनवणे (नंदुरबार), अरविंद देशमुख (नागपूर), रत्नाकर शिंदे (नांदेड) ,मारुती जाधव (नाशिक), किसन शिरलेकर (परभणी), धनंजय पाटील (पालघर), सुधीर मुंडे (बीड) सुरेश साबळे (बुलढाणा), प्रमोद नागदेवे (भंडारा) , प्रभाकर कांबळे (मुंबई),अरविंद जनबदकर (यवतमाळ), संजय सुर्वे(रत्नागिरी) ,शरद पाटील(रायगड), काशीनाथ जनगावे (लातूर),चंद्रसेन डोंगरे (वर्धा), निलेश सोमाणी (वाशिम),शिवाजी इंगवले (सातारा) , दिलीप साटम (सिंधुदुर्ग), शेख सलीमोद्दीन (हिंगोली) इत्यादींची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल सर्वच स्तरावरून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here