मुख्य मार्गाच्या कडेला मोठ्या वाहनांच्या लागतात रांगा* *वाहतूक पोलीस गेले तरी कुठे? नागरिकांचा प्रश्न

0
37
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा
कोरपना तालुक्यात औद्योगिक सिमेंट कारखाने असल्याने येथे लहान मोठ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते वेकोली कोळसा खाणीच्या विरुर गाडेगाव येथून येणाऱ्या मोठ्या वाहनामुळे सुद्धा या ठिकाणी वाहतुकीचे प्रमाण वाढल्याचे चित्र असतांना येथील गडचांदूर ते आवाळपुर मार्गावरील रस्त्यावर स्थित रोशन सर्वो पेट्रोलियम ( पेट्रोल पंप ) येथे येणाऱ्या मोठमोठ्या वाहनांमुळे दररोज मुख्य रस्त्यावर कमालीचा अडथळा निर्माण होत आहे मात्र स्थानिक वाहतूक पोलीस गेले तरी कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधितांकडून हेतुपरस्पर डोळेझाक होत असल्याने ही मंडळी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट तर पाहत नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे या मार्गावर अपघाताच्या बऱ्याच घटना घडल्या असून पोलिसांसोबत ट्रान्सपोर्ट संचालकांचे मधुर संबंध असल्याची चर्चा असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी सदर समस्यांकडे जातीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here