नागरीकांची भीती दूर करण्यासाठी रॅपीड ॲन्टीजेंट टेस्ट किटने तपासणी करा – पारोमिता गोस्वामी यांची मागणी

0
24
Advertisements

मूल – शहरात अचानक कोरोणाचे रूग्ण वाढले असल्यांने, आणि पॉझिटिव्ह आलेल्यांचा संपर्क शहरातील नागरीकांसोबत झालेला असल्यांचे उघड झाल्यांने प्रशासनाने शहरातील नागरीकांची भीती दूर करण्यासाठी रॅपीड ॲन्टीजेंट टेस्ट किटने नागरीकांचे टेस्ट करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या ॲङ पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.
आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे मूल येथे आढावा बैठक घेण्यासाठी आले होते, त्यावेळी ॲङ गोस्वामी यांनी ही मागणी त्यांचेपुढे केली. या मागणीचे अनुषंगाने, आवश्यक तेवढया किट मागवून, रॅपिड ॲन्टीजेंट टेस्ट करण्यांचे जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी मान्य केल्याची माहीती ॲङ गोस्वामी यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना दिली.
मूल शहरात बाहेर राज्यातून आलेल्या मजूरांपैकी आतापर्यंत 24 मजूर हे कोरोणा पॉझिटिव्ह निघाले आहे, दिनांक 12 जुलै रोजी बिहार येथील मजूरांना स्थानिक राईस मील मालकांनी, मजूरींचे कामे करण्यासाठी मूल येथील मजूर कंत्राटदारांनी बिहार येथील 65 मजूरांना मूल येथे आणले.
दिनांक 12 जुलै रोजी हे मजूर मूल शहरात आले असतांना, त्यांना राईस मील मध्ये नेण्यात आले. पाच दिवसांची त्यांचे स्वॅब टेस्टिंग करण्यात आले. या कालावधीत हे मजूर मील मालकांसोबत, तेथील इतर कर्मचारी व मजूरांसोबत संपर्कात आले आहेत. हे मील मालक, स्थानिक मजूर हे त्यांचे कुटूंबासह मूल शहरातील नागरीकांच्या संपर्कात आले आहेत. हे मजूरही पाच दिवस सामान खरेदी करीता, किराणा दुकानात, भाजीपाला मार्केटमध्ये फिरलेले आहे. यामुळे, शहरात भितीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. मूल शहरातील नागरीकांत असलेली भिती प्रशासनाने दूर करण्यांचे दृष्टीने व शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे हितासाठी मोठ्या प्रमाणात रॅपीड ॲन्टीजेंट टेस्ट तातडीने करण्यांची गरज आहे, याकडे त्यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले.
चर्चेच्या वेळी, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार, जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, अमित राऊत, प्रकाश चलाख, सचिन वाकडे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here