देशभरात बांबूच्या राख्याना लोकप्रियता मिळवून देतेय मीनाक्षी

0
267
Advertisements

चंद्रपूर :- लॉकडाऊन मध्ये आर्थिक घडीच विस्कळीत झालेली. तिथे नव्या योजना आणि संकल्पनांचे काय? याशिवाय सगळंच बंद असतांना नव्या दमाने करायचे ते काय? अशा नानाविध प्रश्रांना कर्तृत्वाची उत्तरे देत महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातल्या आदिवासी बहुल चंद्रपुरच्या एका बांबू कलावंत महिलेने महाराष्ट्रच नव्हे देशभरात पर्यावरणपूरक बांबू राख्यांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. ही लोकप्रियता मिळतांनाच वंचित आणि बुरड समाजातल्या महिलांना या संचारबंदी मध्ये हाताला कामही मिळाले आहे. बांबू राख्यांना या संचारबंदीच्या काळात देशभरात लोकप्रिय करणा-या या महिलेचे नाव आहे, मिनाक्षी मुकेश वाळके.
चंद्रपूरच्या झोपडपट्टीत स्वत: गरिबीचे जीने जगणा-या सौ. मिनाक्षी यांनी मागील वर्षीच राख्या बनविण्याची सुरुवात केली. आदिवासी, बुरड आणि वंचित घटकातील महिलांना घेवून काम करणा-या मिनाक्षी यांनी प्लास्टिकमुक्त कलाकृती यावर भर देत आपले काम गेल्या दो वर्षापासून सुरु ठेवले आहे. *द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र* अशी ओळख असलेल्या मिनाक्षी यांनी अमेरिकेतील दोन संस्थांनी प्रायोजित केलेल्या जागतिक दर्जाच्या मिस क्लायमेट या सौंदर्य स्पर्धेचे मुकूट डिजाईन करुन मागील वर्षी इतिहास घडविला होता. दरम्यान लॉकडाऊन ने त्यांच्यासह सर्व राज्याचे मोठे नुकसान झाले. एका अंदाजा नुसार सुरुवातीच्या ३ महिन्यातच महाराष्ट्राच्या बांबू क्षेत्राचं जवळपास १ अब्ज ७२ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले. यात राज्यातील बांबू वर गुजरान करणा-या सुमारे ९ लाखांहुन अधिक लोकांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आले. दरम्यान २४ एप्रिल पासून देशभरात हॅन्डमेड इन इंडिया ही हॅशटॅग मोहिम चालविली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत चा नारा देवून वोकल टू लोकल होण्याचं आवाहन केलं. या संधीचं सोन करत मिनाक्षी यांनी आपल्या कल्पकतेला आणि कलेला कलाटणी देत अत्यंत आकर्षक अश्या राख्यांची निर्मिती केली. याचे वैशिष्ट्य म्हणजे साधा धागा आणि प्लास्टिकचा अंशही नाही. उलट हिंदु संस्कृतीतल्या खाणा-खूणा दिसतील अशी आकर्षक रचना. त्यासाठी सजावट म्हणुन वापरलेले रुद्राक्ष आणि तुळशीचे मणी यामुळे ही राखी अत्यंत देखणी दिसते. मागील वर्षी मिनाक्षी यांनी बांबू राख्यांसह बियाण्यांच्या राख्याही बनविल्या होत्या हे विषेश। यावर्षी त्यांना काही एनजीओ नी सुद्धा प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे दुबई आणि केमन आईसलॅंड येथूनही मागणी आली होती परंतु संचारबंदी मुळे ते शक्य झालं नसल्याचं मिनाक्षी यांनी सांगितलं. त्यांचं म्हणण एवढंच की स्वदेशी वस्तू आणि स्वदेशी कलावंताच्या कलेला आता ख-या अर्थाने वाव देण्याची गरज आहे. आपली अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी वोकल टू लोकल झाल्याशिवाय पर्याय नाही. मीनाक्षी बांबू पासून बहुतेक सर्वच वस्तू बनवितात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here