अवैध रेती वाहतुकीला आळा घाला- नितिन मत्ते शिवसेना जिल्हा प्रमुख

0
145
Advertisements

चिमुर:- चिमुर शहरातील नेरी-पिंपळनेरी रोड वर पहाटे पासून सुरु होण्यार्य अवैध रेती वाहतुकीमुलें सकाळी फिरणाऱ्या नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने त्वरित कार्यवाही करण्यासंदर्भात शिवसेना चिमुरच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख नितिन मत्ते यांचे उपस्थितीत उपविभागीय अधिकारी चिमुर याना निवेदन देण्यात आले.
चिमुर तालुक्यामधे अनेक दिवसांपासून नेरी व पिंपळनेरी रोड वर अवैध रेती वाहतूक दिवसरात्र जोरात सुरु असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, रोज सकाळी फिरायला जाणाऱ्या वृद्ध-महिला-पुरुष-युवक-युवती याना अवैध रेती वाहतुकीमुळे त्रास सहन करावा लागत आहे, सकाळच्या सुमारास अंदाजे 20 ते 25 ट्रैक्टर अवैध रेती घेऊन अतिशय वेगाने वाहतूक करीत असल्याने फिरायला जाणाऱ्या नागरिकांना जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, भविष्यात अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये, यांची खबरदारी प्रशासना घ्यावी असि मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
चिमुर नगर परिषद हद्दीत सीसीटीवी कॅमेरे लावले।असुन त्याद्वारे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रेक्टरवर योग्य ति कार्यवाही करावी, रेती माफ़ियावर कार्यवाही होत नसल्याने रेती माफियांची गुंडागर्दी वाढली आहे, ज्या रेतीमाफीयावर चिमुर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत त्यांची वाहन जप्त करून त्यांच्यावर मोक्क़ा अंतर्गत कार्यवाही करावी, रेती माफ़ियावर कार्यवाही न झाल्यास शिवसेना आन्दोलन करेल असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला.
यावेळी जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नितिन मत्ते, माजी उपजिल्हा प्रमुख धर्मसिंग वर्मा, भारतीय विद्यार्थी सेना उप जिल्हा प्रमुख श्रीहरी सातपुते, उप तालुका प्रमुख केवलसिंग जूनी, मनोज तिजारे, माजी विभागप्रमुख सुधाकर निवटे, व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here