प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर पोलिसांची धाड, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
73
Advertisements

चंद्रपूर – राज्यात प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखू कोरोना मुळे सुरू झालेल्या लॉकडाऊन मध्ये सर्रास पणे विकल्या गेला .
News34 ने जिल्ह्यात नकली सुगंधित तंबाखूचा काळाबाजार या मथळ्याखाली बातमी सुद्धा मागील महिन्यात प्रकाशित केली होती.
लॉकडाऊन मध्ये बाहेर जिल्ह्यातून सुगंधित तंबाखूची वाहतूक बंद झाल्याने स्थानिक तस्करांनी चंद्रपुरातचं नकली सुगंधित तंबाखू बनविण्याच्या मशीन घेत इथेच कारखाना सुरू केला ज्यामुळे चंद्रपुरातील अवैध बाजारात या सुगंधित तंबाखूचा काळाबाजार व्हायला लागला.
चीचपल्ली येथील वलनी जवळील चेक निंबाला मार्गावरील फार्म हाऊस वर मोठ्या प्रमाणात नकली सुगंधित तंबाखूची भेसळ सुरू असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली.
रामनगर पोलिसांनी त्या फार्म हाऊस वर धाड टाकीत तब्बल 50 लाखांचा माल जप्त केला.
या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपीना अटक केली आहे ज्यामध्ये शशिम प्रेमानंद कांबळे वय 48 वर्ष  फार्म हाऊस धारक, लालपेठ निवासी शैलेश जगन्नाथ पटेल, बल्लारपूर निवासी मोहम्मद अब्दुल शेख यांचा समावेश आहे. या कारवाईत सुगंधित तंबाखू बनविण्याचे विविध साहित्य, यंत्र सामुग्री पोलिसांनी जप्त केली.
जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा कारखाना पकडल्याची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
हा नकली सुगंधित तंबाखू चंद्रपूर व बल्लारपूर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकल्या गेला आहे, त्या नकली तंबाखूचा तंबाखू शौकीन यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार ही तर येणारी वेळच सांगणार, पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here