विद्यापीठाच्या परीक्षा रद्द तर पालकमंत्री वडेट्टीवार यांचा शाळा सुरू करण्याचा हट्ट कशाला? राजेश चौहान

0
121
Advertisements

चंद्रपुर – शासना ने ४ ऑगष्ट पासुन चंद्रपुर / गडचिराेली येथिल शाळा सुरू करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे पालक वर्गात असंताेष आहे. चंद्रपुर व गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रूग्नात राेज वाढ हाेत असुन शासना तर्फे शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा अश्या पालकांच्या प्रतीक्रिया येत आहेत. शाळा सुरू करण्यापुर्वी किती ही काळजी संस्था चालकांनी घेतली तरी देखील विध्यार्थी शाळेत कसे सुखरूप राहतील याची काळजी पालकांना वाटु लागली आहे. आणि शाळा सुरू हाेवुन देखील पालक हे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतील की नाही हे ही काही सांगता येत नाही. सध्या काेराेना आजाराचा पादुर्भाव वाढत असुन शासनानी काढलेला आदेश रद्द करावा असे मत अनेक विचारवंताचे व पालकांचे आहेत. शासन व प्रशासन हे वाढत असलेल्या काेराेना च्या आजाराच्या पादुर्भावाला थांबवण्या करिता गंभीर दिसुन येते. मात्र शाळकरी विध्यार्थी यांचा आराेग्याबाबत व त्यांचा हिताचा विचार करतांना मात्र उदासीन का दिसते असा प्रश्न पालक करत आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा शासनाने परत एकदा विचार करावा असे जनसामान्यात बाेलल्या जातांना दिसते.

शासनाने शाळकरी विद्यार्थ्यांची काही हमी घेतली आहे का? एकीकडे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होत आहे तर जिल्ह्याचे पालकमंत्री विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार का बरं करीत आहे असा प्रश्न राजेश सिंग चौहान यांनी शासनाला उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here