संत शिरोमणी गुरू रविदास महाराज महिला मंडळ व चर्मकार समाजा तर्फे प्रणव भसाखेत्रे यांचा सत्कार

0
108
Advertisements

भद्रावती, अब्बास अजानी

भद्रावती येथील संत शिरोमणी गुरू रविदास महाराज महिला मंडळाचे सदस्य सौ. शालिनी व श्री.संजय भसाखेत्रे यांचे चिरंजीव प्रणव भसाखेत्रे हा सेंट अँन्स पब्लिक स्कुल वरोरा यांनी CBSE दहावीच्या निकालात 98.2 टक्के गुणासह प्राविण्य मिळवून जिह्यातुन दुसरा क्रमांक येण्याचा बहुमान पटकाविला.व त्यांनी परिवाराचे तसेच चर्मकार समाजाचे नाव उंचाविला.चर्मकार समाज हा मागासवर्गीय समाज असून समाजात अजूनही शिक्षणाचा अभाव आहे. तसेच समाज हा आर्थिकदृष्ट्या सुध्दा कमकुवत आहे. अशा परिस्थितीत प्रणव भसाखेत्रे यांचा हे यश नक्कीच भूषणावह आहे. यातून समजातील अनेक विदयार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून हे यश मिळविण्यासाठी त्यांनी नियमित अभ्यास करून अथक परिश्रम घेतले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील व गुरुजन यांना दिले.त्याबद्दल त्यांचे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज महिला मंडळ व चर्मकार समाजाकडून अभिनंदन करण्यात आले.व प्रणव भसाखेत्रे ला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मंडळाचे अध्यक्ष सौ. सुषमाताई खंडाळे,सचिव सौ कीर्तीताई पवार ,कोषाध्यक्ष सौ कविताताई मेंढे, तसेच मंडळाच्या सल्लागर समितीचे सदस्य श्री.विनोद खंडाळे ,श्री रवींद्र पवार,श्री.प्रकाश मेंढे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here