चंद्रपूर – जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दिनांक 23 जुलै 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी नाव नोंदणी करावी. यासाठी उमेदवारांकरीता संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा.
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले स्टोअर मधुन महास्वयम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंट वर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वन या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा.आय अॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर पात्रतेनुसार जुळणारे विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय बटनावर क्लिक करा.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांनी आयोजित या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीस्त जास्त चंद्रपूर जिल्ह्यातील विदयार्थ्यांनी, युवकांनी रेजिस्ट्रेशन करून लाभ घ्यावा असं आव्हान युवासेना जिल्हा समन्वयक इंजि. निलेश बेलखेडे यांनी केले आहे.
Job ricvered sir is most emergency job ricivment