चिमूर- चिमूर परिसरातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी दिवस रात्रौ लपून पाडत ठेऊन असताना दि. 18/7/2020 चे सकाळी 2/00 वा. दरम्यान खबर मिळाली की आरोपी सौरभ चांदेकर, शानु शेख, किशोर नान्हे सर्व रा. चिमूर यांनी आरोपी रामस्वरूप राजपूत रा चिमूर याचे घरी देशी दारूचा मुद्देमाल ठेवलेला असून तो मुद्देमाल नेण्यासाठी सदर आरोपी हे मोटार सायकलने येत आहे या माहितीवरून अंधारात सातनाला परिसरातील झुडुपात बसून असताना दोन मोटार सायकल येताना दिसल्यावर त्यांचा पाठलाग केला असता सदर आरोपीने मोटार सायकल सोडून पळाले असता आरोपी रामस्वरूप भारतसिंग राजपूत याचे राहते घरी रेड केली असता एकूण देशी दारूच्या 19 पेट्या , 2 मोटार सायकल क्र. MH 31 DG 4819 , MH 34 AT 6335 असा एकूण 3,14,400 रु. चा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपितांवर गुन्हा नोंद करून आरोपी नामे रामस्वरूप भारतसिंग राजपूत वय 45 वर्ष रा. माणिक नगर चिमूर यास अटक करून उर्वरित आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. तसेच नेरी परिसरातील आरोपी हेमंत संभाजी नगराडे याचे राहते घरी रेड केली असता त्याचे कडून 6500 रु चा देशी दारूचा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाही उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर श्री . अनुज तारे साहेब , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पो.ठाणे चिमूर यांचे अधिपत्याखाली पोउपनी किरण मेश्राम , पोहवा विलास निमगडे , विलास सोनूले, नापोशी किशोर बोढे , कैलास आलम, पोशी सचिन खामनकर , सुखराज यादव, सतीश झिलपे, रवी आठवले , विजय उपरे यांनी पार पाडली.
चिमूर पोलिसांची दारू तस्करांवर धडक कारवाई, दारूच्या 19 पेट्या सहित 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
Advertisements