नांदाफाट्यावरील सुगंधीत तंबाखू विक्रेत्याचे घरी गडचांदूर पोलीसांची धाड, प्रकरण मॅनेज ? हाती गवसला एक डब्बा

0
40
Advertisements

गणेश लोंढे /नांदा फाटा
आवारपूर रोडवर सुगंधीत तंबाखू विक्रेत्याचे घर असून दिनांक १७ जुलै रोजी रात्रीचे ७:४५ वाजताचे सुमारास बल्लारपुर वरुन महिंद्रा कंपनीचे आॅटोट्राली क्रमांक एम एच ३४ बि जी ७२०९ ने सुगंधीत तंबाखाची खेप आली व सुगंधीत तंबाखू उतरविण्यात आला याची कुणकुण गडचांदूर पोलीसांना लागली असावी त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व शिपाई इंदल राठौड यांनी याविक्रेत्याच्या घरी धाड टाकली धाडीत पोलीसांना सुगंधीत तंबाखू मिळाला नाही असे सांगण्यात येत आहे पोलीसांनी याविक्रेत्याला व आॅटोट्रालीला आवारपूरकडे नेल्याची खात्रीलायक माहीती असून प्रकरण मॅनेज केल्याची कुजबुज स्थानिक नागरिकांमध्ये आहे आॅटोट्राली भरुन सुगंधीत तंबाखू आल्यावरही पोलीसांना साठा कसा काय मिळाला नाही मोठी रक्कम घेऊन मामला रफादफा केल्याची शक्यता नाकरता येत नाही गावातील पोलीस पाटील व इतर कोणालाही पंच म्हणून पोलीसांनी मोक्यावर का नेले नाही सदर विक्रेत्यांचा पुर्वीपासूनच सुपारी व सुगंधीत तंबाखूचा व्यवसाय करतो आता हा विक्रेता पानटपरीवाल्यांना सुगंधीत तंबाखू पोहचता करुन देत आहे प्रकरणात सेटलमेंट झाले असल्याने नाममात्र कारवाई साठी एकच डब्बा कसा काय मिळाला लाॅकडाऊनच्या काळात अनेक छोट्यामोठ्या खर्रा विकणार्‍यांकडूनही पैसे वसुलल्याचे बोलले जाते पोलीसांची भुमिका संशयास्पद असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here