भद्रावती, अब्बास अजानी
भद्रावती पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण विभागाने यशस्वी सापळा रचून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला मुद्देमाल सह अटक करून त्याच्याकडून 1 लाखाची दारू जप्त करण्यात आली.
दि 17 जुलैच्या रात्री 12:30 वाजे दरम्यान गुप्त माहितीच्या आधाराने भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह येथील सुमठाणा चौकात सापळा रचला असता 1 लाखाची देशी दारूसह आरोपीला अटक करण्यात यश आले.एक पांढऱ्या कलरची मारोती 800 कार वणीवरून भद्रावती मार्गे चंद्रपूर ला जात असून त्यात दोन इसम अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत आहेत. अशी गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार सुमठाणा चौक येथे नाका बंदी केली असता सदर वर्णनाची कार चंद्रपूरकडे जातांना दिसून आली.त्या कारचालकाला थांबविण्याचा ईशारा केला असता त्याने कार दूरवर थांबवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा यशस्वी झाला. तर त्याच्या सोबत असलेला दुसरा ईसम जिवन भालचंद्र चिकटे (42) रा. लक्ष्मीनगर वणी जि. यवतमाळ हा पोलिसांच्या हाती लागला.
त्याची विचारपूस करून कार ची झडती घेतली असता देशी दारू संत्रा च्या शिष्या असलेला 7 खरड्याचे बॉक्स व एका प्लास्टिक पिशवीमध्ये 90 एम एल मापाच्या रॉकेट संत्रादेशी दारूच्या एक हजार रुपये या दारुसोबत 2 लाख रुपये किमतीचा कार आणि दहा हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी संच एकूण 3 लाख 10 हजार रुपय किमतीचा मुद्देमाल आरोपिकडून जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपी याला न्यायालयात हजर असता त्याला दि.20 जुलै पर्यत पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे. दुसरा आरोपी कार चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ,वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे ,भद्रावती ठाणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार ,पोलीस शिपाई सचिन गुरनुले ,हेमराज प्रधान ,निकेश ढगे, यांनी केली.