हे उद्धवा……!अजब तुझे सरकार, गडचांदूरात भाजपतर्फे वीज बिलांची होळी

0
239
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
वीज बिल भरू नये,वीज बिल माफ झालेच पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे.याच श्रेणीत गडचांदूर शहरात भाजपा महिला आघाडी,युवा मोर्चा,गडचांदूर शहरतर्फे वीज बिल माफी व इतर मागण्यांना घेऊन शहरातील अनेक प्रभागासह येथील संविधान चौकात महाआघाडीच्या वीज बिलाची होळी करण्यात आली.वास्तविक पाहता “कोरोना”च्या पार्श्वभूमीवर लोकांचा रोजगार बुडाला,जगण्यासाठी साधन राहिलेले नाही अशा बिकट परिस्थितीत भरमसाठ व वारेमाप वीज बिल लोकांना पाठविण्यात आले आहे.याचा निषेध करत कुणीही वीज बिल भरू नये असे आवाहन माजी नगरसेवक नीलेश ताजने यांनी जनतेला केला आहे.तसेच लॉकडाऊनमुळे लोकांना काम नसल्याने आर्थिक संकट निर्माण झाले असून अडचणीत सापडलेल्या गोरगरीब,सर्वसाधारण नागरिकांना परिवाराचे पालनपोषण करणे कठीण झाले असताना आलेले तीन महिन्याचे वीज बिल भरायचे कसे ही समस्या निर्माण झाली आहे.ही बाब अन्यायकारक असून आजघडीला या आघाडी सरकारचा कुठल्याही कार्यावर नियंत्रण राहिलेला नाही यामुळे “हे उद्धवा…!अजब तुझे सरकार” हे म्हणण्याची वेळ आली आहे असे मत गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांनी यानिमित्ताने मांडले.वीज बिल माफ करा या मागणीसह शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करण्यात यावी,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह बंल्यावर हल्ला करणार्‍याला त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी,चंद्रपूर जिल्ह्यातील रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावी,गोरगरिबांसाठी शासनाने त्वरित पॅकेज जाहीर करावा,अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.यासंबंधीचे निवेदन तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली असून भाजप शहराध्यक्ष उपलेंचीवारसह नगरसेवक रामसेवक मोरे,माजी नगरसेवक नीलेश ताजने,जेष्ट नेते शिवाजी सेलोकर,महेश शर्मा,महादेव एकरे,संदीप शेरकी,रोहन काकडे,हरीश घोरे,इरफान शेख,उत्तम देवकर,गजानन शिंगरू, कृष्णा भागवत, वैभवराव, पुरुषोत्तम मुसळे,संजय कोंडबत्तुलवार,आकाश लांडे,गणपत बुरडकर,गजानन चिरडे,अनील संकुलवार,मनोज डोंगरे,राकेश अरोरा,सत्यदेव शर्मा इतरांची सदर आंदोलनात प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here