कोरपना तालुक्यात भाजपचे सदस्य अभियान जोरात, कुटुंब सर्वेक्षण फार्म भरून देण्यास नागरिकांचा उत्साह शिगेला

0
70
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका हा अतिदुर्गम क्षेत्र असून आदिवासी,गोरगरीब,दलीत शोषित,पीडीत म्हणून ओळखला जाते.येथे भाजप कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या सदस्य अभियानाला सुरुवात करण्यात आली असून यात अनेक नागरिकांनी भाग घेतल्याची माहिती देण्यात आली असून इतर ठिकाणांसह येरगव्हाण येथे घरोघरी जाऊन सदस्य अभियान राबवत असताना नागरिक उत्साही दिसत होते.तालुकाध्यक्ष हिवरकर यांनी स्वतः फार्म भरून दिले व अभियानाचे महत्व पटवून देत केंद्र शासनाच्या योजनाबद्दल सखोल माहिती दिली.सदर अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल हिवरकर यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here