राजकीय आंदोलनास बंदी असतांना सुद्धा भाजपचे आंदोलन

0
155
Advertisements

घुग्गुस – देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे, दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णामध्ये वाढ होत आहे, आज देशातील कोरोना बाधितांची संख्या 10 लाखांच्या जवळ पोहचली आहे.

राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, 144 कलम लागू आहे, लग्न समारंभात सुद्धा मोजकेच पाहुणे बोलविण्याची अट, 5 च्या वर नागरिकांनी एका ठिकाणी जमा होण्यास प्रतिबंध आहे, पण हे नियम फक्त सामान्य नागरिकांवर लागू असतात, कारण राजकीय नेते आंदोलन करतेवेळी कुणाचीही परवानगी घेत नाही, परवानगी मिळत नाही यावेळी सुद्धा 50 च्या वर कार्यकर्ते जमा करत आंदोलने होत आहे, यावर पोलीस प्रशासन मात्र काही कारवाई करताना दिसत नाही.

Advertisements

असंच नियमांना डावलून एक आंदोलन घुग्गुस मध्ये झाले, नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात वीज बिल माफ करणे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ, खतांचा पुरवठा करणे, रमाई आवास योजनेचे पैसे, बारा बलुतेदार व गरिबांना पॅकेज अश्या अनेक मागण्यासाठी आंदोलन झाले.

ज्याप्रमाणे कोरोना काळातील कायदे हे सामान्य नागरिकांना लागू आहे तर राजकीय पक्षांना का नाही?

याबाबत news34 ने घुग्गुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की राजकीय आंदोलनाला परवानगी मिळत नाही, सोबतच काही दिवसांपूर्वी कांग्रेस खासदार यांनी सुद्धा आंदोलन केले असल्याचे सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात आधीच कोरोना बाधित रुग्णाचा आकडा 200 च्या वर गेला आहे, प्रशासनाने यावर नियंत्रण करण्यासाठी पुन्हा काही भागात लॉकडाऊन केले, प्रशासन एकीकडे नागरिकांना नियम पाळण्याचे सल्ले देत आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या नियमांना डावलण्याचे काम राजकीय पुढारी करीत आहे, यावरून स्पष्ट होते की नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी आहे राजकीय पुढाऱ्यांसाठी नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here