वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या परिवाराला आमदार धानोरकर यांच्या हस्ते आर्थिक मदत

0
271
Advertisements

वरोरा : आपल्या परिसरात शेती जंगलाला लागून आहे. मोठ्या प्रमाणात वनप्राणी शेतात येत असतात. त्यात शेतीचे मोठे आर्थिक नुकसान होत असून अनेकदा शेतकऱ्यांचे जीव देखील गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कुटुंबीय उघड्यावर येत असते. पीडितांना आर्थिक मदत त्वरित मिळावी म्हणून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पाठपुरावा करून हि मदत पीडितांच्या कुटुंबियांना स्वतःच्या हस्ते  ४,८०,०००  रु. चा धनादेश दिला.

जनतेचे प्रश्न त्वरित सोडविले जावे, शासकीय योजनांचा गरजूना लाभ मिळावा, कोणावरही अन्याय होता काम नये अशी भावना ठेऊन मतदार संघात नेहमी तत्पर आमदार प्रतिभाताई धानोरकर असतात. आपल्या मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाची मदत पोहचविण्याकरिता त्या आग्रही असताना दिसून येतात. त्या फक्त आग्रही नसून पुढे येऊन त्या कृतीतून देखील कार्य करीत असतात. वरोरा तालुक्यातील मोखाळा या गावातील विट्टल काळमेघे यांच्या दि. १८ जून २०२० रोजी रान डुकराच्या हल्ल्यात मुत्यू झाला. त्यात त्यांच्या कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला. हि बाब आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढे आली. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित पंचनामा करून मदत मोडून देण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामा करून मदत दिली.

Advertisements

आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पीडितांच्या कुटुंबियांना  ४,८०,०००  रु. चा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. राठोड, ,झाडे ,उराडे तसेच  पोलीस पाटील मोखाडा मंगला पोटे, प्रांजली मत्ते यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here