चंद्रपुरातील टाळेबंदीचा आज पहिला दिवस, काय सुरू काय बंद बघा व्हिडीओ

0
35
Advertisements

चंद्रपूर : कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं आजपासून दहा दिवसांचा लॉक डाऊन घोषित केलाय. चंद्रपूर शहर आणि लगतच्या दुर्गापूर, उर्जानगर ग्रामपंचायत हद्दीत ही टाळेबंदी राबवली जात आहे. शहरात येणाऱ्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून, अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जात आहे. औषधांची दुकानं, पेट्रोल पंप वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आजपासून 21 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतिष्ठानांना सुरू करण्याची मान्यता दिली जाणार आहे. कोरोनाबधित शोधणे आणि बाहेरून चोरीछुपे आलेल्या लोकांचा शोध घेणे, यासाठी ही कवायत केली जात आहे.

काय सुरू काय बंद

17 ते 21 या पहिल्या पाच दिवसात चंद्रपूर मनपा हद्द ,ऊर्जानगर, दुर्गापुर या भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद राहणार आहे. झोमॅटो, स्वीगी, डोमीनोज व शहरातील सर्व हॉटेल्स व खानपानच्या घरपोच सुविधा देखील बंद असतील .

२) तर 21 ते 26 या कालावधीत पुढील पाच दिवसांसाठी केवळ अत्यावश्यक व खाद्य वस्तूंची पुरवठा करणारी दुकाने, त्यांचे ठोक विक्रेते, जसे खाद्य पदार्थ, किराणा,दूध दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड ,फळे, भाजीपाला अंडी, मांस,मासे, बेकरी, पशुखाद्य, कृषिविषयक आस्थापने यांची दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत फक्त सुरू राहतील. खानपानाच्या केवळ घरपोच सेवा सुरू राहतील.शाळा महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था,कोणत्याही प्रकारचे शिकवणी वर्ग, 17 ते 26 दहा दिवस पूर्णतः बंद असणार आहेत. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने, दोन चाकी,तीन चाकी, चार चाकी वाहने देखील संपूर्णता बंद राहतील .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here