घरकुल धारकांनो चिंता करू नका लवकरच सगळ्यांचे पैसे जमा होतील, गडचांदूर न.प.उपाध्यक्ष जोगींचे दिलासादायक आवाहन

0
112
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहर हे तालुक्यातील इतर शहरांपेक्षा लोकसंख्येने जास्त असून शहराच्या आजूबाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिमेंट कंपन्या,कोलमाईन्स आहे.यामुळे एक मोठा मजूर वर्ग याठिकाणी वास्तव्यास असून कच्चे घर, झोपड्या,तुटपूंज्या पगारात आपापल्या कुटुंबांसह कसेबसे दिवस काढत आहे. अशातच पंतप्रधान आवास योजना उदयास आली.ज्यांना घर नाही अशा कुटुंबांना हक्काचे घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला.ही योजना बेघरांना एका अर्थी वरदानच ठरली.याच श्रेणीत स्थानिक नगरपरिषदेत सदर योजने अंतर्गत 1200 अर्ज प्राप्त झाले.ज्यांचे आखीव पत्रिका,सातबारा आहे अशांना प्रथम डीपीआर मधून 77 लोकांचे घरकुल मंजूर झाले.महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता म्हणून 40 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.परंतु केंद्र सरकारच्या निधीतून काहीच पैसे भेटले नाही.आपणास माहिती असून अख्ख्या जगाला सध्या चिन पुरस्कृत “कोरोना” नामक जीवघेण्या विषाणूने अक्षरशः हादरवून सोडले आहे.पुर्वी काही तांत्रिक अडचणी तर गेल्या 3,4 महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने उशीर होत आहे. आपल्या अडचणीची आम्हास पुर्ण जाणीव असून थोडा धीर ठेवा महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.सध्या शासनप्रशासन कोरोनाशी लढा देत असून दररोज रूग्णांचा आकडा वाढत असला तरी शासनप्रशासन योग्यरितीने परिस्थीती हाताळत असल्याने हळुहळू शासकिय कामांना गती प्राप्त होत आहे. परिस्थीती पूर्वपदावर येत असून घरकुल धारकांना विनंती आहे चिंता करू नका लवकरच सगळ्यांचे पैसे खात्यात जमा होणार आहे.असे दिलासादायक आवाहन गडचांदूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष “शरद जोगी” यांनी घरकुल धारकांना केला आहे. अफवानवर विश्वास ठेवू नका,विश्वास गमावू नका असा आपुलकीचा सल्ला ही जोगी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here